latest and larege collection of marathi sms in unicode,prem prem love miss u latest sms collection in Marathi language
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा
माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघत
राहतो माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल
आणि मेसेज करतो माझी चुकी नाही कि मी तुला
इतका लाईक करतो माझी एवढीच चुकी आहे कि मी
तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो.
किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते.
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय…
I love u म्हणण्यासाठी 3 सेकंद लागतात,
विचार करण्यासाठी 3 मिनिटे लागतात,
समजण्यासाठी 3 तास लागतात,
व्यक्त करण्यासाठी 3 दिवस तर
स्पष्टीकरण देण्यासाठी 3 आठवडे लागतात,
पण सिद्ध करण्यासाठी सगळे आयुष्य लागते…
आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा....
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि
वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.
डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
आयुष्य खुप थोडं असतं, त्यात आपल्याला
खुप काही हवं असतं, जे हवं असतं, ते
मिळत नसतं आणि ते मिळालं तरी खुप
काही कमी असतं, कारण कारण चांदण्यांनी
भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामचं असतं!
ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी…
आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी…
मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.
फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी...
नाही मी तिचा , हे जाणून नहि....
फक्त माझ्याचसाठी जगणारी...
अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी...
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..
जेव्हा तुम्ही कोणा खास
व्यक्ती बरोबर
असता.तुम्ही त्याचाकडे
दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण
जेव्हा ती खास
व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर
त्यालाच शोधत असते.हो ना ...
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.
प्रिये..
तुझी ईच्छा असेलच तर मी
मरण्यास तयारआहे पण,
खरे विष दे..
शब्दांचे विष नको ग देवूस..
कारण ख-या विषाने
एकदाच मरेन पण..?
शब्दाच्या विषाने सारखा
मरेन..
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा
आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो....!!! "
सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र...
माझ्या मनातच राहिला....
मनातच राहिला...
सुप्रभात